जादुची भुकटी

ठो !

विचारात गुंग असलेले चोरोबा कुणाच्या तरी अंगावर आदळले. तो एक साधू होता. साधू बघताच चोरोबांना फार आनंद झाला.

एकदम लोटांगणच घातले बोवाजीपुढे. बोवाजींनी आशीर्वाद दिला, "बेटा, सुखी रहा !"

तरी चोरोबांनी साधू - चरणांवरून डोके उचलले नाही.

"बेटा, काय हवं तुला ? तू मांगशील ते मी देईन."

"साधू महाराज, मी एक चोर आहे. मला चोरी करतानाच नेहमी शिपाई पकडतात. तरी अशा वेळी मला कोणी बघू शकणार नाही असं करा."

साधूबाबांच्या गालांना खळी पडली. ते वदले, "ठीक ! ही घे जादूची भुकटी. ही नाकानं ओढताच तू दिसेनासा होशील, जा."

चोरोबा खूष झाले.

चांदोबा डोईवर आला. भुकटी डबी कंबरेला खोचून ते कमगिरीला निघाले. सावकाराचं घर आलं. चोरोबांनी भिंत पार केली. खिडकीतून तिजोरीजवळ गेले. तिजोरी उघडायचे सामान मेजावर ठेवले. आणि साधूबाबांचे नाव घेत जादूची भुकटी नाकात कोंबळी.

"फाड ..... ! फाड ....... !! ओऽऽ कं..... शी ! !"

चोरोबांना शिकांनी अगदी हैराण केले.

जानवे चचपत सावकार उठला. दंडे सावरीत नोकर उठले..... दिवे लागले.... उजेडात तिजोरीशी खाट - खुट करीत असलेले चोरोबा दिसले.

ताबडतोब या मंडळीनी चोराला पकडले. भोळसट चोरोबांना जादूची भुकटी चांग़लीच भोवली ! कारण ती तपकीर होती.

No comments: