आम्ही कोण

अस्सल मराठी-मराठी साहित्य दालन
अस्सल मराठी-मराठी साहित्य दालन या ब्लॉगची निर्मीती करताना तो इतर ब्लॉगप्रमाणे "आणखी एक ब्लॉग" या संकल्पनेत मोडणारा नसावा हा विचार मनाशी पक्का होता.यामुळेच वेगवेगळ्या लेखकांचे दर्जेदार साहित्य एकाच ठिकाणी वाचायला मिळावे असा ब्लॉग तयार करायचे मनात आले.

ब्लॉगची सजावट
अस्सल मराठीची सजावटही इतर ब्लॉगपेक्षा वेगळी व आकर्षक असावी हा विचार करून मी स्वत: ब्लॉगरच्या टेम्पलेटमधे काहि बदल केले,ज्यामुळे ब्लॉग अधिक सुटसुटीत दिसत आहे.

माझी भुमीका
या ब्लॉगमधे माझी भुमीका लेखक,संकलक व व्यवस्थापक अशी आहे.प्रकाशित साहित्य वेगवेगळ्या लेखकांकडून साभार घेण्यात आले आहे.साहित्याचे स्वामीत्व हक्क असणा-यांच्या नावाचा साहित्याखाली उल्लेख आहे.काहि साहित्याचे मूळ स्वामी कोण?याबद्दल संभ्रम असल्यामुळे अथवा नावाची माहिती उपलब्ध नसल्याकारणाने अशा ठिकाणी "अनामीक" असा उल्लेख आहे.

टीप:आपले लेखन या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाले असल्यास व नावाचा उल्लेख नसल्यास अथवा चूकीचा असल्यास कृपया आम्हाला तत्काळ निदर्शनास आणून द्या.

आभार
अस्सल मराठीच्या निर्मीतीस हातभार लावणा-या व प्रकाशित साहित्य उपलब्ध करणा-या ज्ञात-अज्ञात साहित्यकारांचे आभार!
आमच्या असंख्य वाचकांचे जे प्रेम आम्हाला मिळाले व मिळत आहे याबद्दल आम्ही त्यांचे ॠणी आहोत.तुमचे प्रेम आमच्या पंखांमध्ये असेच बळ भरत राहिल अशी अपेक्षा आहे.

मायमराठीची अशीच सेवा आमच्या हातून घडत राहो!लोभ असावा!

विनायक अनिवसे(पुणे)
निर्मीती-व्यवस्थापन