मराठीत लिहा

मराठीत लिहिण्यासाठी फोनेटिक टायपिंग या पद्धतीचा वापर करणे फार सोपे आहे. "फोनेटिक टायपिंग" म्हणजे इंग्रजीमध्ये उच्चार केल्याप्रमाणे इंग्रजी रोमन लिपीतून मराठी लिहिणे. योग्य सॉफ्टवेअर वापरता त्या इंग्रजीतून लिहिलेल्या मराठीचे देवनागरी मराठीत रूपांतर करता येते.

खालील माहिती फक्त "Windows" प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम)शी संबंधित आहे. लिनक्स प्रणाली बद्दल माहिती http://indlinux.org/ येथे उपलब्ध आहे.

बराहा - यासाठी "बराहा" हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून प्रस्थापित करावे.
बराहा डाऊनलोड करा.

गमभन टंकलेखन सुविधा - गमभन या आणखी एका टंकलेखकाची याकरीता तुम्हाला मदत होईल शिवाय यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करायची गरज नाही.गमभन या संकेतस्थळावर तुम्ही थेट मराठी/देवनागरीत लिहू शकाल.

मायकोसॉफ्ट ऑफिस - मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ लिप ही आणखी एक मराठी लिहिण्याची पद्धत आहे. मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया ह्या संकेतस्थळावर ह्याबद्दल माहिती उपलब्ध आहे.

मराठी लिहिण्याबद्दल आणखी एक लेख येथे उपलब्ध आहे: http://gparab.diinoweb.com/files/Online%20Fol/Font%20Problem.pdf आशा आहे की या माहितीचा ब-याच वाचकांना उपयोग होईल. आपल्या मराठीत लिहिण्याच्या उपक्रमाला शुभेच्छा!

या लेखातील काही भाग मराठी ब्लॉग विश्व या संकेतस्थळाकडून साभार