हिमेश रेशामीया ची लावणी...

हिमेश रेशामीया ची लावणी...
चाल : रेशमाच्या रेघांनी
फड/तमाशा : प्रशांत लास व्हेगासकर आणि देवेंद्र न्यूयॉर्ककर
तुणतुणे वादक : नरेन्द्र इंदोरीकर
प्रकाशक : कुणाला मुजीक
नर्तकी : ऐश्वर्या कांबळे, खाकी सावंत , अंतरा काळी (कुट्ट)


रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण कसा माझा की हो फोडिला
हात नका लावु त्याच्या सीडीला

नवी कोरी कॉपी सुफि साजाची
'टोपी' चढविली रिमिक्स बाजाची
बजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटिमधे तोंडाजवळ ओढिला
हात नका लावू त्याच्या सीडीला

गात जाई प्रत्येक गाणं नाकात
रसिकंच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर इम्रान हाशमी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडी ला

कॄपा त्याच्यावर सल्लू मियांची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा देवा, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडी ला

एक फायदा दिसे त्याच्या गाण्यात
गाढवही वाटे गाते सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा, दूरदेशी धाडिला
हात नका लावु त्याच्या सीडी ला...

मूळ विडंबनकार:मिलिंद छत्रे
मिलिंद छत्रे यांचा ब्लॉग

2 comments:

मिलिंद छत्रे said...

हे विडंबन चारुदत्त ह्यांचे नसून माझे आहे.. जे मी 'मिल्या' नावाने प्रथम 'मायबोली' maayboli.com वर लिहिले होते.. मूळ विडंबन माझ्या संकेतस्थळावर वाचता येईल..

रेशमिया

विनायक अनिवसे said...

माफ करा,मध्यंतरी ऑर्कुटमधील एका समुहामध्ये ’चारूदत्त’ नावाच्या एका व्यक्तीने हे विडंबन त्याच्या नावावर प्रसिद्ध केले होते,त्यावेळी त्यांच्या परवानगीने मी हे विडंबन इथे प्रसिद्ध केले होते.चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
मी तुमच्या नावाचा उल्लेख नक्कीच करेन.