माझे ते चींब रुप ही परत हवय मला

तुझ्या डोळ्यांतून ओघळणारा
एक न एक थेंब हवाय मला
सखे, तुकड्या तुक्ड्यातका होईना
माझे अक्स परत हवय मला

भिजलेले माझे ते रुप
गालावरुन ओघळताना
थरथरत असेनही कदाचीत, पण..
सखे, ओठांकडे वळण्या अगोदर
माझे ते चींब रुप ही परत हवय मला

मनात उठलेले काहुर अन
ह्रदयातील अग्नी शमविण्यास
तुझ्या डोळ्यांतून ओघळणारा
एक न एक थेंब हवाय मला

सखे, तुझ्याकडे असणारा माझा
एक न एक कण हवाय मला
तुकड्या तुक्ड्यातका होईना
माझे अक्स परत हवय मला

मूळ कवी:गणेशा

No comments: