ओळखलंत का मॅडम मला.....

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझे केस, खांद्यापर्यंत वाढलेले होते...... मी M.B.A.ला Admission घेतली आहे.... आणि Collegeमधे मला रोज सांगायचे केस कापून ये..... आणि ज्या दिवशी मी केस कापून गेलो तेव्हा मला काही Teachers, Students नी ओळखलंच नाही......
त्यादिवशी मी ही कविता लिहिली...... कणाचं विडंबन आहे.....
यातून कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहि..... कॄपया कुणी गैरसमज करुन घेऊ नये.
मी हि कविता जेव्हा collegeमधे वाचून दाखवली, तेव्हा मला जबरदस्त प्रतिसाद मिळाला......

ओळखलंत का मॅडम मला.....

ओळखलंत का मॅडम मला..... कॉलेजात आला कॊणी.
केस नव्हते पिंजारलेले, केली होती फणी.
क्षणभर बसला, गालात हसला, हसला केसांकडे बोट दावून.
सलून मधून आत्ताच आलो, आलो केस कापून.
कटिंगसाठी नंबर लावताना मनातूनंच रुसलो.
न्हाव्यापुढेही मग मी, मान खाली घालून बसलो.
तोही थोडा ऊदास झाला पाहून माझ्या जटा.
म्हटला सगळे नको कापायला, उडवू थोड्याचं बटा.
पाठिकडे हात जाताच, पटकन बेंचवरुन ऊठला.
शाबासकी नको मॅडम मला, मनी Sincereपणा दाटला.
कापले जरी केस तरी सोडला नाही उडाणटप्पूपणा.
Attendanceवरती बोट ठेवून फक्त Lectureबुडव म्हणा......

मूळ विडंबनकार:कुणाल

No comments: