आणखी हायकू....तू.....

हायकू हा जपानी काव्यप्रकार आहे.यात तिन ओळी असतात.पहिली ओळ प्रश्नार्थक असते,तर दुसरी व तिसरी ओळ त्याचे समर्पक उत्तर असते....उदाहरणादाखल माझेच एक हायकू देत आहे.

.....(१)
खरं सुख कशात ?
अडकणं तुझिया कुंतलात,
तुझिया सुरेख पापण्यांत.

तू....

तू जवळ नसलीस की,
मन माझं हेलकावे खात रहातं,
हृदयाला दूर सारून पळत सुटतं.

तू दिसली नाहीस की,
मन माझं कावरं बावरं होतं,
काळीज तट तट तुटत रहातं..

तू बोलली नाहीस की,
मला अपराधी असल्यासारखं वाटतं,
तुझे शब्द ऐकण्या मन आतुर होतं...

तू हसली नाहीस की,
निर्झराचं खळखळणं थांबल्यासारखं वाटतं,
चंचल मन बालकासारखं वाट पहात बसतं....

तुझी आठचण झाली की,
मी माझे मीपण हरवून बसतो,
हृदयात माझ्याच,डोकावणं विसरतो.....

मूळ कवी:अरविन्द

No comments: